प्रकल्पग्रस्तांसाठी आता सर्वंकष धोरण
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण राज्य सरकार आणेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासाठी तसंच त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सरकार करेल.यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना राज्य सरकारच्या सेवेत सरळसेवा भर्तीच्या माध्यमातून सामावून घेण्यासाठी न्यायालयाचे निर्णय तपासून मार्ग काढण्यात येईल असं ते म्हणाले.
पूर्वी प्रकल्पग्रस्तांना सरळसेवा भर्तीच्या माध्यमातूनच शासनाच्या सेवेत सामावून घेतलं जातं होतं , नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे रद्द करावं लागलं मात्र अनुकंपाच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका आहे .विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून यातून मार्ग काढत प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
ML/KA/SL
24 March 2023