खोटी कागदपत्रे तयार करून केली तब्बल ६५ बांधकामे
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट असलेल्या २७ गावातील ६५ विकासकांनी महापालिकेची खोटी कागदपत्रे तयार करून बांधकामे रेरा मध्ये नोंदणी करून बांधली त्यासाठी विशेष तपास समिती नेमली आहे, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना गणपत गायकवाड यांनी उपस्थित केली होती, त्यावर प्रमोद पाटील यांनी उप प्रश्न विचारले. या जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडून तीस दिवसात अहवाल प्राप्त केला जाईल असं मंत्री म्हणाले.
याप्रकरणी ५३ विकासकांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत, १४ विकासकांना mrtp अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे, ३७ बांधकामे अनधिकृत घोषित करण्यात आली आहेत असंही मंत्री सामंत म्हणाले.
तिलोरी कुणबी विद्यार्थ्यांना न्याय
राज्यातील तिल्लोरी कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत असलेल्या अडचणी सोडवले जातील असं आश्वासन इतर मागावर्गीय विकास मंत्री अतुल सावे यांनी दिलं.
याबाबतची लक्षवेधी सूचना राजन साळवी यांनी उपस्थित केली होती, त्यावर योगेश सागर, शेखर निकम यांनी उप प्रश्न विचारले होते. त्यांच्या प्रमाणपत्राना जात पडताळणी समिती मार्फत नकार दिला जात आहे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून येत्या पंधरा दिवसात अहवाल प्राप्त करून घेऊ आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
ML/KA/SL
24 March 2023