पूर प्रतिबंधक उपाय म्हणून कोकणातील ही नदी होणार गाळमुक्त
महाड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सावित्री या कोकणातील महत्त्वाच्या नदीवर गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात येणाऱ्या प्रचंड पुरामुळे नदी काठावरील जनजीवन धोक्यात येते. महाड या सावित्री नदीच्या तीरावर वसलेल्या शहराला पूराचा सर्वांधिक धोका निर्माण होते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आता सावित्री आणि तिच्या उपनद्यामध्ये साचलेला गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे महाड शहरामधील पूरस्थितीवर नियंत्रण (Flood control) मिळवता येणार आहे.