अरविंद केजरीवाल यांना ED कडून समन्स

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागील शुक्लकाष्ठ आता पुन्हा सुरु झाले आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.
ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे. ईडीने त्यांना 21 डिसेंबर रोजी समन्समध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी ईडीने दारू घोटाळ्याप्रकरणी समन्स जारी केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते जाऊ शकले नाही.
काय आहे प्रकरण
गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकानं बंद करून नवीन निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या अगोदर दिल्लीत ७२० दारूची दुकाने होती. त्यापैकी २६० खासगी दुकाने होती. मात्र, नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
SL/KA/SL
18 Dec. 2023