तब्बल १८ वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून सुटका

मुंबई दि ३(मिलिंद माने)– अंडरवर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळी उर्फ डॅडी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून तब्बल १८ वर्षांनी सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. गुन्हेगारी विश्वात अंडर वर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळीला उर्फ डॅडीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्या वेळापूर्वीच त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे . मुंबईतीलच नव्हे तर जगभरात त्यात गॅंगस्टर म्हणून अरुण गवळी प्रख्यात होता. आज नागपूर मधील मध्यवर्ती कारागृहातून त्याला जामीन मंजूर होतात नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत आणले विमानतळावर आल्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. मुंबईमध्ये सन २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी अरुण गवळीला जन्मठपेशी शिक्षा झाली होती. त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात तब्बल १८ वर्षापासून अरुण गवळी शिक्षा भोगत होता.
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात मागील १८ वर्षापासून शिक्षा भोगत असणारा अरुण गवळी सातत्याने जामिनासाठी प्रयत्न करीत होता. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भर दिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता तब्बल १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर झाला आहे. ML/ML/MS