आर्थिक फसवणुकीसाठी शिक्षेचा कालावधी आणि दंड रकमेत वाढ…

मुंबई दि १५ — राज्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षा कालावधी तसंच दंडाची रक्कम वाढवण्यात येईल, त्यासोबतच त्यांची मालमत्ता लिलाव करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
याबाबतचा मूळ प्रश्न अमोल खताळ यांनी उपस्थित केला होता, त्यावर प्रकाश सोळंके , सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न विचारले. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी परवानगी , त्यांची विक्री यासाठी खूप वेळ लागतो यामुळे हा कालावधी कमी करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात मैत्रेय कंपनीने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यांच्या ४०९ मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी ३६० मालमत्तांची आर्थिक गणती करण्यात आली आहे, त्यातून सध्या दीड ते दोन हजार कोटी रुपयांची वसुली होऊ शकते,त्यातून पुढील नऊ महिन्यात संबंधित गुंतवणूकदारांना रकमा परत देण्यात येतील अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याआधी दिली होती. ML/ML/MS