95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस यांना अटक

 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस यांना अटक

धाराशिव, दि. २५ : दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंति 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातही लाचलुचपत विभागाने थेट कारवाई करत तलाठ्याला रंगेहात अटक केली होती.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *