पॅरोल रजेवर सोडलेल्या कैद्यांची धरपकड

 पॅरोल रजेवर सोडलेल्या कैद्यांची धरपकड


मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड 19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित ,आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. मात्र कोविडचा प्रादुर्भाव संपृष्टात आल्यानंतर काही कैदी कारागृहांमध्ये न परतल्याने मुंबई पोलिसांकडून अशा प्रकारच्या कैद्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.Arrest of prisoners released on parole leave

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन कारागृहातील कैद्यांना पॅरोल रजेवर सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. कालांतराने कोरोनाचे संकंट हळुहळु दुर झाल्याने पॅरोल रजेवर सोडलेल्या कैद्यांना मुदतीत कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. परंतु शासनाने कैद्यांच्या बाबतीत दाखविलेली सहानुभुतीचा काही कैद्यांनी गैरफायदा घेत मुदतीत संबंधीत कारागृहात परत न जाता फरार झाले होते. म्हणून अशा फरार कैद्यांचा शोध घेवून त्यांना परत कारागृहात पाठविण्याकरीता विशेष शोध मोहिम राबविण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले.
त्यानुसार मुंबई पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी या विशेष शोध मोहिमेवर जातीने लक्ष पुरवून देखरेख केली. विशेष शोध मोहिमेंतर्गत आजपर्यत कोविड- 19 कालावधीमध्ये संचित , आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त केलेल्या व परत कारागृहात न गेलेल्या एकुण 18 बंदींना अटक करून संबंधित करागृहामध्ये शिक्षा भोगण्याकरीता परत पाठविण्यात आले आहे.

ML/KA/PGB
2 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *