विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत आरामाची व्यवस्था

सोलापूर दि ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यामध्ये यंदा विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास आरामाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तासनतास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना आराम मिळावा. त्यांची बैठक व्यवस्था आणि त्यांना इतर सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन रांगेत चार ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कुमार यांनी आज कार्तिकी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष दर्शन रांगेची पाहणी केली. दर्शन रांगेमधील घुसखोरी थांबवण्यासाठी बॅरिकेटिंग मधील अंतर कमी करणे. ठीकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे. पोलीस सुरक्षित वाढ करणे. असे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले.
त्याचबरोबर भाविकांना चंद्रभागेचे स्नान करता यावे यासाठी 14 नोव्हेंबर रोजी उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच गेल्या चार वर्षापासून बंद असलेला जनावराचा बाजार यंदा वाखरीच्या पालखीतळावर परत एकदा सुरू होणार आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वैद्यकीय तपासणी करूनच आवश्यक पद्धतीने जनावरांचा बाजार भरवला जाणार आहे.
SL/KA/SL
9 Nov. 2023