विधानसभेसाठी सुमारे ८०० मराठा उमेदवार इच्छुक

जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता पर्यंत सुमारे 700/ 800 इच्छुकांनी अर्ज उमेदवारीसाठी सादर केले आहेत अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला एक वर्ष होणार असल्याने अंतरवाली सराटीत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठा समाजाने देशातील प्रचंड मोठा लढा उभारला आणि तो यशस्वी केला . याप्रसंगी ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतरवाली सराटीत चर्चेला यावं असे आवाहन ही जरांगे यांनी केले आहे.
आता पर्यंत सुमारे 700/ 800 इच्छुकांनी अर्ज सादर केल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली. जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते बोलत होते. 29 ऑगस्ट 2024 रोजी मराठा आरक्षण आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार असल्याने अंतरवाली सराटीत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याचं जरांगे म्हणाले. 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत होणारी राज्याच्या मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली असून येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. मराठा समाजाने देशातील प्रचंड मोठा लढा उभारला आणि तो यशस्वी केला असं मत यावेळी जरांगे यांनी व्यक्त केले.