फरार आरोपी कृष्णा आंधळे ची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

बीड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबर २०२४ रोजी खून झाला होता, तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती.
यामध्ये कृष्णा आंधळे यांच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर आणि केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत.सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ML/ML/PGB 16 Feb 2025