राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत सामावून घेण्यासाठी आझाद मैदानात झाले आंदोलन
मुंबई, दि. १८
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या डीएस इंटरप्राईजेस कंट्रोल ऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक कार्य सर्व कर्मचारी सांभाळून घेण्यासाठी आझाद मैदान येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाते. त्याकरीता महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी सदर आरोग्य अभियान अंतर्गत कामगार, कर्मचाऱ्यांची विविध पदांवर नेमणूक केली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत १२०० कर्मचारी सन २०१६ पासून प्रामाणिकपणे आरोग्य सेवा बजावत आहे.
इतर महानगरपालिकेप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या अधिकारात कामगार, कर्मचाऱ्यांशी करार करुन त्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतु त्या ठिकाणी डी.एस. इन्टरप्रायझेस या ठेकेदारास निविदा प्रक्रिया राबवून नियुक्ती केली. सदर डी. एस इन्टरप्रायझेस ठेकेदाराने निविदाच्या कराराप्रमाणे कामगार, कायदा नियमानुसार कुठलीच वेतनवाढ, प्रसुती रजा, पी.एफ., आरोग्य विमा योजना यासारख्या सुविधा या कामगार, कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत.
कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी काम करून सुध्दा कोरोना भत्ता (डेटा ऑपरेटर यांना) वारंवार मागणी करुन सुध्दा दिलेला नाही. या कामामुळे अनेक कामगार, कर्मचारी आजारी पडले, परंतु त्यावेळी सर्व कामगार, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे मुंबई महानगरपालिकेच्या परिसरातील नागरिकांची अहोरात्र सेवा केलेली आहे. खरे पाहता कमी पगारामध्ये काम करणे हे मुंबईसारख्या ठिकाणी अशक्य आहे. तुटपुंज्या पगारामुळे दैनंदिन खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य खर्च इ. अनेक बाबी पैश्याची गरज असताना घर चालविणे कामगार, कर्मचाऱ्यांना जिकिरीचे होत आहे. सदर
बाकेदाराकडून कुठलेच सहकार्य मदत केली जात नाही.
युनियनच्या माध्यमातून या विषयावर वारंवार लेखी पत्र दिलेले आहेत, वैठका सुध्दा झाल्या. ना गंभीर प्रश्नाकडे आयुक्त आरोग्य भवन, आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका व संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देवूनः सुध्दा आजमितीपर्यंत डी. एस. इन्टरप्रायझेसवर कारवाई न झाल्याने मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत काम करणारे डॉक्टर, तंत्रज्ञ, औषधनिर्माता, परिचारीका, लसीकरण अधिकारी, समाजविकास अधिकारी, डेटा ऑपरेटर, कामगार, कर्मचारी या सर्व संवर्गामध्ये शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आहे. परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे संबंधित डी.एस. इन्टरप्रायझेसवर कारवाई केली जात नाही. नाइलाजास्तव १२०० कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने केले जाईल अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि चिटणीस संजय वाघ यांनी दिली.KK/ML/MS