राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्र पूजन..

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्र पूजन..

नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपुरात विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावर्षीचे प्रमुख पाहुणे प्रख्यात गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत शस्त्रपूजा केली. Arms worship on behalf of Rashtriya Swayamsevak Sangh..

नागपूर रेशीमबाग स्मृती मंदिर संघ स्थानावरील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन आणि पथसंचलन कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

अखंड भारताचे विचार आणि संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी आरएसएसचे योगदान अतुलनीय आहे , असे शंकर महादेवन यांनी यावेळी सांगितले . आपला देश जर गाणे असेल तर संघाचे स्वयंसेवक हे त्याचे सरगम ​​आहेत असे शंकर महादेवन यावेळी म्हणाले.

नुकत्याच नागपुरात पार पडलेल्या सी 20 परिषदेत भारताचे जगात विशेष स्थान निर्माण झाले असे प्रशंसनीय काम येथे झाले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 100 हून अधिक पदके मिळाली . अर्थव्यवस्थेत भारत दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात स्टार्ट अप क्रांती आली आहे, शेती , अंतराळ क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे असे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.

ML/KA/PGB
24 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *