राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का?

 राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का?

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अर्थसंकल्पात मंजूर झालेली कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.Are the development projects in the state Gujarat, Karnataka?

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदारानी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय.. अशा घोषणा त्यांनी दिल्या यामुळे गदारोळात प्रश्नोत्तरे झाली आणि तीन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले.

ML/KA/PGB
20 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *