त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप

 त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप

नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं. अशातच यंदा महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम देवस्थान ट्रस्टनं आयोजित केला आहे. पण, या कार्यक्रमावर आधीच माजी विश्वस्तांनी नारीज व्यक्त केलीय. अशातच, आता पुरातत्व विभागानं आक्षेप व्यक्त केल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रम रद्द होणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरातत्व विभागाचा आक्षेप व्यक्त करत पुरातत्व विभागानं त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र लिहिलं आहे. महाशिवरात्री
निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ, अवशेष अधिनियम १९५८ या कायद्यानुसार पुरातत्व विभागाकडून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या कार्यालयातून परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्व विभागानं दिले आहेत.

मंदीर समितीच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनीही प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, व्हीआयपी दर्शनसाठी उत्तरेकडील गेटवर 200 रुपये शुल्क घेतल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. अशा प्रकारे प्रवेश शुल्क घेणे एएमएएसआर कायद्याचे उल्लंघन आहे, अशातच देवस्थान ट्रस्टनं तातडीनं सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पुरातत्व विभागाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.

ML/ML/SL

25 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *