रब्बी पिक हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किमतीला मंजुरी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा आणि दिवाळी या सणांपूर्वी केंद्र सरकारने देशातील शेतकरी वर्गासाठी समाधानकारक निर्णय घेतला आहे.सरकारने ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2% वरून 7% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.MSP म्हणजेच पिकांची किमान आधारभूत किंमत. ही किंमत केंद्र सरकारकडून ठरवली जाते. पिकांचे बाजारभाव जरी घसरले तरीही केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते.एमएसपीचा उद्देश शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचवणे हा आहे.
गहू आणि मोहरीसह 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गहू, बटाटा, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरी ही मुख्य रब्बी पिके मानली जातात. गव्हाची किमान आधारभूत किंमत 150 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. याशिवाय मोहरीची किमान आधारभूत किंमत 400 रुपये करण्यात आली आहे.
या पिकांच्या MSP मध्ये वाढ
- मसूरच्या एमएसपीमध्ये 425 रुपये प्रति क्विंटल वाढ
- गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 रुपये प्रति क्विंटल वाढ
- हरभऱ्यासाठी एमएसपी 105 रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे
- करडई पिकाच्या एमएसपीमध्ये 150 रुपये प्रति क्विंटल वाढ
- बार्लीच्या एमएसपीमध्ये 115 रुपये प्रति क्विंटलने वाढ
- तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये 200 रुपये प्रति क्विंटल वाढ
SL/KA/SL
18 Oct. 2023