कोकण विभागात १६८ कृषी पर्यटन केंद्रांना मान्यता

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच काही काळ शांत- निवांत क्षण जगण्यासाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी कृषी पर्यटन ही संकल्पना आता आपल्या राज्यात चांगलीच रुजली आहे. पर्यटन विभागाकडूनही या कृषी पर्यटन केंद्रांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. राज्यातील कोकण विभागाच्या निसर्गरम्यतेमुळे या ठिकाणी कृषी पर्यटनाच्या अधिक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटन मंत्रलायाच्या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत कोकण विभागात पर्यटन विभागाकडून १६८ जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २३ प्रस्ताव मजूर करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायासासह तरुणांना रोजगारही मिळणार आहे.
कोकणातील ग्रामीण भागांसह किनारी भागात कृषी पर्यटनासह मत्स्य शेतीलाही निश्चितपणे चालना मिळू शकते. कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत कोकणातील २५६ संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील २४३ संस्थांनी यासाठी निश्चित केलेल्या प्रस्तावातील प्रक्षेत्राला पर्यटन अधिकाऱ्यांनी भेट देऊन फेर पडताळणीही केली. त्यापैकी १६८ प्रस्तावंना मान्यता मिळाली आहे. त्यात ठाणे २७, पालघरमधील ३८, रायगड ६१, रत्नागिरी २३ आणि सिंधुदुर्गातील १९ प्रस्तावांचा समावेश आहे.
SL/KA/SL
13 Sept. 2023