तृतीयपंथी महामंडळावरील नियुक्त्या येत्या दोन महिन्यांत…

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तृतीयपंथी समाजासाठी पाच वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्यांत केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर दिली. प्रताप सरनाईक यांनी ती उपस्थित केली होती. वर्षा गायकवाड यांनी त्यावर उपप्रश्न विचारले.
विभागीय आणि जिल्हा स्तरावर ही यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्यावरील नियुक्त्या ही याच दोन महिन्यात करण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात आल्यावर तृतीयपंथियाना बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. Appointments to third party corporations in next two months…
पुणे महानगरालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने तृतीयपंथियांची कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिका मध्ये अशा नियुक्त्या करण्यात याव्यात अशी सूचना त्यांना केली जाईल असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/PGB
3 Aug 2023