तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती

 तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलात विविध रेजिमेंट्समध्ये आता महिला अधिकारी उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. महिला अधिकाऱ्यांच्या या धैर्याला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्कराच्या तोफखान्यात इतिहासात पाहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच महिला अधिकाऱ्यांची आज तोफखानाच्या रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट मेहक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट अदिती यादव आणि लेफ्टनंट पवित्र मुदगील अशी या महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि इतर दोन पाकिस्तानच्या सीमेजवळील “आव्हानात्मक ठिकाणी” तैनात आहेत.

SL/KA/SL

29 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *