पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवाची संधी मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद केली होती. 10वी, 12वी उत्तीर्ण, पदवीधर (UG), पदव्युत्तर (PG) किंवा 21 ते 24 वर्षे वयोगटातील डिप्लोमाधारक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे.
या योजनेसाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी 10वी, 12वी उत्तीर्ण किंवा पदवी, डिप्लोमा पात्रता असावी. तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते लवकरात लवकर अर्ज करून त्यांच्या करिअरला नवी दिशा देऊ शकतात.
SL/ML/SL
7 March 2025