कळमनुरी मतदार संघासाठी संतोष बांगर यांचा अर्ज दाखल
हिंगोली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कळमनूरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज कळमनूरी येथील तालुका कार्यालयात दाखल केला. यावेळी मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मागील पाच वर्षात आपण केलेली कामाची परतफेड म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा विशाल जनसागर लोटला असून आपला विजय निशित असल्याची प्रतिक्रिया यावेळी संतोष बांगर यांनी व्यक्त केली.
ML/ML/SL
24 Oct. 2024