औरंगाबादमधून इम्तियाज जलील यांचा अर्ज दाखल

छ. संभाजीनगर, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी एमआयएम पक्षाने शहरातील भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ही रॅली सुरु झाली. या रॅलीत मोठ्या संख्येने एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते तसेच समर्थक नागरिक उपस्थित होते.
तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मी मागील पाच वर्षात खासदार म्हणुन केलेल्या विकास कामांमुळे शहरातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत असुन मी निश्चितच ही निवडणुक जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारकडून आणलेल्या निंधीचा वापर विकास कामात कसा केला, किती आणला यावर एक छोटे पुस्तक लिहीणार आहे, प्रचारादरम्यान या पुस्तकाचे वाटप करण्यात येईल, जिल्ह्यातील सर्व नागरिक माझे आहेत त्यांना कळायला हव आपल्या खासदाराने काय केलं ते असं वक्तव्य प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना दिल्ली माहित नाही या आरोपांवर बोलताना दिले. निवडून आल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा आणि शाळांच्या इमारती व आधुनिकीकरण याला प्राधान्य देईल असे आश्वासन दिले.
ML/ML/SL
24 April 2024