Apple चे tap to pay फीचर लवकरच होणार लाँन्च
मुंबई, दि. २२ : Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात Gpay आणि फोनपे सारख्या पेमेंट अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी Apple pay ही सेवा सुरु करणार आहे. Apple pay च्या माध्यमातून Apple भारतात आपले प्रसिद्ध ‘टॅप-टू-पे’ फीचर सादर करणार आहे. या मदतीने, युजर्स पेमेंट मशीनवर फक्त त्यांचा आयफोन टॅप करून सहजपणे देय देण्यास सक्षम आहेत. यासाठी पिन घालण्याची गरज नाही.
सध्या Apple pay ची ही सेवा जगभरातील 89 देशांमध्ये उपलब्ध आहे आणि आता Apple ही सेवा भारतातही आणणार आहे. गेल्या काही वर्षांत Apple ने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले आहे. अशा परिस्थितीत Apple च्या इकोसिस्टम फीचर्सची भारतात लाँचिंग कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते. IDC च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025 च्या तिमाहीत कंपनीने देशात 50 लाख युनिट्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली.
SL/ML/SL