Apple ची नवी ऑपरेटिंग सिस्टिम लाँच

Apple आपल्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर कॉन्फरन्स (WWDC) 2025 मध्ये आयफोन्स आणि आयपॅड्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे. कंपनीने नवीन आणि रीडिझाइन केलेल्या iOS 26 आणि iPadOS 26 ची घोषणा केली आहे. या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि सुधारणा असून, ‘लिक्विड ग्लास’ नावाच्या नव्या डिझाइन लँग्वेजचा समावेश आहे.
iOS 26 अपडेट मिळणारे आयफोन मॉडेल्स:
iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max
iPhone SE (2nd generation)
iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max
iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max
iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max
iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max
iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max
iPhone 16e
ज्या आयफोन्समध्ये A13 किंवा त्यापुढील चिप (Chip) आहे, त्यांना iOS 26 अपडेट मिळणार आहे. याचा अर्थ, iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max या मॉडेल्सना हे आगामी अपडेट मिळणार नाही. तसेच, गेल्या वर्षीप्रमाणे, प्रत्येक आयफोनला ‘ॲपल इंटेलिजन्स’ फीचर्स मिळणार नाहीत.