अ‍ॅपल-सिनेमन केक

 अ‍ॅपल-सिनेमन केक

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

४५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

१२५ ग्रॅम/अर्धा पाव/साडेचार औंस कणीक (१ वाटी)
१२५ ग्रॅम/अर्धा पाव/साडेचार औंस मैदा (१ वाटी)
१०० ग्रॅम साखर (३/४ वाटी)
१०० ग्रॅम किसमीस/बेदाणे
१२५ मि.ली. सूर्यफूल तेल किंवा असेल ते (अर्धी वाटी)
१२५ मि.ली. सफरचंदाचा ज्युस (अर्धी वाटी)
२ अंडी, फेटुन
२ सफरचंद, सालीसहीत किसुन
२ टी स्पून बेकींग पावडर
१ टी स्पून सिनेमन/दालचिनी पूड
मुठभर बदामाचे तुकडे (केकवर टाकायला, ऐच्छिक)
१ चमचा पिठी साखर ( केकवर भुरभुरायला, ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन आधी १८० सेल्सिअसला (साधारण ३६० फॅरनहाइट) गरम करुन घ्या. फॅन ओव्हन असेल तर १६० सेल्सिअस ला गरम करुन घ्या.
२. केक बनवण्यासाठी जे भांडे वापरणार असाल त्याला बटरचा हात लावुन घ्या. या केकसाठी ९”/२३ से.मी. वाले केकचे गोल भांडे पुरेसे होते.
३. एका भांड्यात कणीक, मैदा, सिनेमन पावडर, बेकींग पावडर एकत्र मिसळुन मग चाळुन घ्यावेत.
४. त्यात साखर आणि किसमीस टाकुन मिसळावे.
५. वरच्या मिश्रणात मध्यभागी एक खोलगट खड्डा करुन त्यात तेल, फेटलेली अंडी, सफरचंदाचा ज्युस, किसलेले सफरचंद टाकुन नीट एकजीव करावे.
६. हे सगळे मिश्रण केकच्या भांड्यात टाकावे वरुन बदामाचे तुकडे टाकावे आणि ओवन मध्ये ४०-४५ मिनीटे बेक करावे.
बेक केल्यावर सुईने किंवा टुथपिक ने ब्रेडला टोचुन बघावे, जर सुईला काहीही पीठ लागले नसेल तर केक तयार झाला असे समजावे. पीठ असेल तर अजुन ५-७ मि. बेक करावा.
७. बेक झालेला केक ओव्हन बाहेर काढुन ५ मि. निवु द्यावा आणि मगच भांड्याच्या बाहेर काढुन थंड व्हायला ठेवावा आणि त्यावर चाळणीने पिठीसाखर टाकुन सजवावे.

ML/ML/PGB
23 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *