स्विगी आणि झोमॅटोपेक्षा स्वस्तात फूड डिलिवरी देणारे ॲप
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी अॅप्सना टक्कर देण्यासाठी आता ‘वायू’ waayu हे नवीन App सज्ज झाले आहे. बाजारात सध्या उपलब्ध फूड डिलिव्हरी अॅप्सपेक्षा स्वस्तात फूड डिलिव्हरी देणार असल्याचा दावा या अॅपने केला आहे. कंपनीने अभिनेता आणि हॉटेल व्यावसायिक सुनील शेट्टी यांची वायुचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्या हस्ते नुकतेच हे अॅप लाँच करण्यात आले.
‘वायू’ हे अॅप आता मुंबईतील हॉटेल्सकडून वापरले जात आहे. इतर अॅग्रीगेटरच्या तुलनेत हे अॅप 15 ते 20 टक्के स्वस्त अन्न याद्वारे उपलब्ध होईल. वायुला मुंबईमधील इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) आणि इतर उद्योग संस्थांनी पाठिंबा दिला आहे. भगत ताराचंद, महेश लंच होम, केळीचे पान, शिवसागर, गुरु कृपा, कीर्ती महल, फारसी दरबार आणि लाडू सम्राट यासह 1,000 हून अधिक मुंबई रेस्टॉरंट्स प्लॅटफॉर्मशी जोडलेली आहेत.
वायू अॅप हे Destec Horeca चा एक भाग आहे, ज्याची स्थापना उद्योजक अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे यांनी केली आहे. हे अॅप
‘वायू’ कडून रेस्टॉरंट्सकडून कोणतेही कमिशन शुल्क आकारत नाही. यामुळे, रेस्टॉरंट्स ग्राहकांना कमी किमतीत जेवण देऊ शकतात. यामुळे वायूचे फूड डिलिव्हरी इतर अॅप्सपेक्षा स्वस्त असेल. Google Play Store वरुन आणि waayu.app वेबसाइटवरून तुम्ही हे अॅप डाउनलोड करू शकता.
SL/KA/SL
10 May 2023