भटक्या कुत्र्या-मांजरांबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई मनपाचे App
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मनपाच्या शहरातील भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी अधिक सक्रीयपणे काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेकडून भटक्या प्राण्यांसाठी स्वतंत्र पशुवैद्यक रुग्णालय उघडण्यात आले आहे. त्यानंतर आता पशुवैद्यकीय विभागाने कुत्रे आणि मांजरींच्या संदर्भातील तक्रारींसाठी एक मोबाइल ॲप तयार केले आहे. कुत्रा चावणे, परिसरात कुत्र्यांची संख्या वाढणे, भटके कुत्रे व मांजरींचा उपद्रव, कुत्रा व मांजरींचे लसीकरण, त्यांची नसबंदी अशा कोणत्याही तक्रारी आणि विनंती या ॲपवर करता येणार आहे. पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे (व्हीएचडी) हे ॲप स्वयंचलित असून यावर केलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्याची प्रक्रिया ॲपद्वारे करण्यात येणार आहे.
अनेकदा परिसरात भटक्या श्वानांची किंवा मांजरांची संख्या वाढते, कधीकधी एखाद्या श्वानाला रेबीज झाल्याचा परिसरातील नागरिकांना संशय असतो, तर कधी कोणाचा पाळीव श्वान खूप भुंकत असतो.अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राण्यांच्या संदर्भात असतात. आतापर्यंत नागरिकांना विभाग कार्यालयात जाऊन किंवा ई – मेलवर यासंदर्भातील तक्रारी करता येत होत्या. हे ॲप सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ४० तक्रारी आल्या आहेत. तक्रार संबंधित विभाग किंवा संबंधित सामाजिक संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम या ॲपद्वारे केले जाते.
नागरिकांना तक्रारी करणे सोपे व्हावे, तसेच या तक्रारींवर वेळीच कार्यवाही करता यावी यासाठी महापालिकेच्या पशुवैद्याकीय विभागाने एक ॲप तयार केले आहे. पशुवैद्याकीय आरोग्य विभाग ( VHD) ॲप्लिकेशन असे त्याचे नाव असून महापालिकेच्या संकेतस्थळावरून या ॲपवर जाता येते.
SL/ML/SL
12 July 2024