वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अ‍ॅप

 वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अ‍ॅप

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदुषणाच्या (Air Pollution) तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर “मुंबई एअर’ (Mumbai Air) नावाचं एक ऍप्लिकेशन विकसित केलं आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा (Application) वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील ऍपमध्ये दिली आहे. प्रारंभी एण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे ऍप्लिकेशन वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

मुंबईतील वायू प्रदुषणावर नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपययोजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांना आपल्या भागातील वायू प्रदुषणाची तक्रार मांडण्यासाठीचे डिजिटल माध्यम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पर्यावरण विभागाला दिले होते. त्यानुसार पर्यावरण विभागाने नागरिकांच्या सहज वापरासाठीचे असे मोबाईल ऍप्लिकेशन तसेच संकेतस्थळावर (वेब पोर्टल) उपलब्ध करून दिले आहे. मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या भागातील तक्रारींची मांडणी करणे सहज शक्य आहे. तर महानगरपालिकेच्या विभाग पातळीवर या तक्रारींची दखल घेत तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली. लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मवर देखील हे ऍप उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

App introduced for air pollution control

ML/KA/PGB
10 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *