*भारतातील एकमेव आणि अद्वितीय गणेशोत्सव – ज्यात तुमच्यातील विवेक बुद्धि होईल जागरूक!
मुंबई, दि २ :
मुंबईच्या फोर्ट भागातील ‘अंतर योगच्या गुरुकुलात यंदाचा गणेशोत्सव देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं कारण आहे या उत्सवाचं अद्वितीय स्वरूप — ज्यामध्ये केवळ पूजाअर्चा नव्हे, तर गणपती आणि अथर्वशीर्षावरील गहन ज्ञान, साधना आणि जीवनात परिवर्तन घडवणारी ‘गणेश विद्या’ शिकवली जाते.
३ सप्टेंबर २०२५ हा या दहा दिवसांच्या उत्सवातील गणेशभक्तांसाठी अत्यंत विशेष व सर्वोच्च आध्यात्मिक शक्तिचा दिवस… जेव्हा घडणार आहे
- तुमच्यातील नेतृत्व गुण, निर्णय क्षमता व कुंडलिनी शक्ती जागृत करणारी गणेश विद्येची शेकडो वर्षांनंतर पुनरुज्जीवित केलेली गूढ साधना
- श्री गणपती अथर्वशीर्षाचे १००० वेळा पठण – ५१ तपस्वी ब्राह्मण आणि गणेशमय सद्गुरूंच्या सान्निध्यात
- गणेश याग आणि शास्त्रोक्त अभिषेक
- आचार्य उपेंद्रजींचे ज्ञान सत्र
- ब्राह्मण भोजन आणि ब्राह्मण दान – जिथे प्रत्येक भक्त प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतो
या उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे – गणेश पुराण, गणेश गीता आणि उपनिषदांमधील विज्ञानपूर्वक सांगितलेली ‘गणेश विद्या.’ आचार्य उपेंद्रजींनी स्वतः कोट्यवधी गणेश मंत्र जप करून आणि जगातील सर्वात सखोल व विस्तृत “गणेश अथर्वशीर्ष टीका ग्रंथ” लिहून एक ऐतिहासिक कार्य केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून हजारो साधक या उत्सवाचा अनुभव घेत आहेत. त्यांच्यामते –“आचार्यजींच्या मार्गदर्शनाखाली, इथे केवळ विधी होत नाहीत – तर जीवनातील अडथळे कमी होतात, विघ्नांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते, निर्णयक्षमतेत सुधारणा होते, मानसिक शांतता प्राप्त होते आणि यशाची वाट उघडते. जीवनाला दिशा मिळते.”
या अद्वितीय गणेशोत्सवात सहभागी व्हा आणि अनुभवा:
१००० वेळा गणेश अथर्वशीर्ष सहस्रावर्तन, लुप्त झालेल्या बीज मंत्रांचा गूढ अर्थ आणि प्रत्यक्ष साधना, गुरुकुलातील अत्यंत प्रभावशाली ऊर्जेचा अनुभव,अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम,सनातन शास्त्रांप्रमाणे यज्ञ, अभिषेक, ब्राह्मण सेवा, आचार्य उपेंद्रजींकडून ‘गणेश विद्या’वर सखोल मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
‘आज विद्यार्थी, व्यवसायिक इथपासून कलाकार, राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व क्षेत्रातील व्यक्ती या सत्रांचा लाभ घेत आहेत. अंतर योग गणेशोत्सवामागे आचार्यजींचा दिव्य हेतु असा की ‘भारताला विश्वगुरू बनविण्याचे महान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाचे नेतृत्व करणारे दूरदर्शी, दृढनिश्चयी, सक्षम व सत्याधिष्टित नायक घडविणे आणि भारताच्या उत्थानासाठी सदैव सज्ज राहणारी विवेकशील, नीतिमान, आणि आत्मबळ असलेली पिढी निर्माण करणे.”
असा ज्ञानमय आणि विज्ञानमय गणेशोत्सव, आजच्या काळात कुठेही पाहायला मिळत नाही. सर्व गणेशभक्तांनी अंतर योगच्या गुरुकुलात ३ सप्टेंबरच्या कार्यक्रमाला येऊन या दिव्य सोहळ्याचा अनुभव घ्यावा.
ही संधी वर्षातून फक्त एकदाच मिळते. या उत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी संपर्क: ७७१०९ ४८४६१. KK/ML/MS