कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू

 कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू

छायाचित्र प्रातिनिधिक

भोपाळ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. नामिबियाहून आणलेल्या चित्ता ‘शौर्या’चा दुपारी मृत्यू झाला. चित्ता बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान शौर्यचा मृत्यू झाला.
सकाळी 11 वाजता चित्त्यांवर नजर ठेवणाऱ्या पथकाने त्याला पाहिले तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. टीमने त्याला शांत केले आणि त्याला CPR (कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन) दिले. काही वेळाने त्याला शुद्धी आली पण तो खूप अशक्त झाला होता.शौर्यच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. असे एकूण 20 चित्ते आणले होते. त्यापैकी 10 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्याच्या मृत्यूनंतर संख्या 14 वर आली आहे. यात चार पिल्लांचा समावेश आहे. तीन आठवड्यांपूर्वी नामिबियातून आणलेल्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिला होता. याआधी मार्च 2023 मध्येही चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील तिघांचा काही महिन्यांतच मृत्यू झाला होता.

दरम्यान चित्ता प्रकल्पाचे प्रमुख असलेले डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच यातील धोके सांगितले होते. कुनोचे जंगल २० चित्त्यांकरिता लहान असल्याने काही चित्त्यांना राजस्थानच्या मुकुंद्राच्या जंगलात पाठवण्यास देखील त्यांनी सुचवले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता हे चित्ते मृत्यूमुखी पडत असल्याची चर्चा देशभरातील वन्यजीवतज्ज्ञामध्ये होत आहे.

SL/KA/SL

16 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *