मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन
मुंबई दि.31 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली असून या फोननंतर मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याबाबतचा धमकीचा फोन आला आहे. या सध्या पोलिसांकडून मंत्रालय परिसर आणि इमारतीमध्ये तपासणी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पुन्हा मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. या फोननंतर मंत्रालयच्या बाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. डॉग स्क्वॅयड आणि बॉम्ब शोध पथक मंत्रालय परिसरात तपासणी करत आहेत. मंत्रालयात येणाऱ्या गाड्यांची सखोल तपासणी केली जात आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि त्याच्या ठिकाणाची माहिती देखील समोर आली आहे. बाळकृष्ण ढाकणे असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. या धमकीच्या फोननंतर मंत्रालयाच्या संपूर्ण परिसराची आणि इमारतीची तपासणी करण्यात आली पण बॉम्ब कुठेच नसल्याची पोलिसांची खात्री केली. कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी घाबरुन जावू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
SW/KA/SL
1 Sept. 2023