५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या वर्षींच्या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील होरमुसजी एम. कामा ( साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता), अश्विन बालचंद मेहता (वैद्यकीय), राम नाईक- (सार्वजनीक सेवा), राजदत्त तथा दत्तात्रय अंबादास मायाळू (कला), प्यारेलाल शर्मा (कला) आणि कुंदन व्यास ( साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता) या ६ मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहेत.
तसेच महाराष्ट्रातील उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा), डॉ. मनोहर कृष्णा डोळे (वैद्यकीय),झाकीर काझी ( साहित्य आणि शिक्षण), चंद्रशेखर महादेवराम मेश्राम (वैद्यकीय), कल्पना मोरपारिया ( उद्योग आणि व्यापार ), शंकर बाबा पापळकर ( समाजसेवा) या ६ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता कोनिडेला चिरंजीवी, प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम् आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
SL/KA/SL
26 Jan. 2024