प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया कार्याध्यक्ष, पवारांची घोषणा

दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी अपेक्षेनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या खास मर्जीतील नेत्यांची नियुक्ती अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर केली असून अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही.
आज नवी दिल्ली इथे पक्षाच्या स्थापना केली दिनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी ही घोषणा केली आणि पटेल, सुळे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांची तसेच पक्ष विभागांची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या वर गोवा , मध्य प्रदेश , गुजरात , राजस्थान आदी राज्ये तर सुप्रिया सुळे यांच्या वर महाराष्ट्र , हरियाणा , पंजाब या राज्यांसह महिला , युवक युवती तसेच लोकसभा निवडणुक नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याखेरीज मोहम्मद फैजल , जितेंद्र आव्हाड, नरेंद्र वर्मा आदी नेत्यांवर विविध राज्ये आणि पक्षाच्या विविध विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ML/KA/SL
10 June 2023