अण्णाभाऊ साठे यांचा ‘फकिरा’ झळकणार रूपेरी पडद्यावर
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘ख्वाडा’,‘बबन’आणि ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपटांचा वस्तूपाठ निर्माण करणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भाऊराव कऱ्हाडे आता लवकरच नवीन चित्रपट घेऊन प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या दर्जेर लेखणीतून साकारलेली आणि आजही वाचकांना भावणारी ‘फकिरा’ही कादंबरी भाऊराव कऱ्हाडे रूपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव ‘फकिरा’ असं असून त्यांनी नुकतंच या चित्रपटाची घोषणा केली.हा चित्रपट येत्या आगामी वर्षी रिलीज होणार आहे.
या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. समाजाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा आत्यंतिक जुलूम आणि सर्वांविरोधात बंड करणारा लढवय्या ‘फकिरा’ याचे यथार्थ चित्रण करणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीचे चित्ररूप रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
२०२५ मध्ये ‘फकिरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर्मित ‘फकिरा’ चित्रपटात प्रमुख भूमिका कोण साकारणार? अद्याप हे तरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंग वेळी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई मधुकर साठे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेते नागेश भोसले, कमलेश सावंतसह आदि मान्यवर उपस्थित होते.
SL/ML/SL
16 April 2024