विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे

मुंबई दि २५ — विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उद्या, बुधवार 26 मार्च 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज (25 मार्च) शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.