वालावलकरांचो थोरलो जावई ! ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कुणाल भगत लग्नबंधनात

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर आणि संगीतकार कुणाल भगत हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू होती, यात साखरपुडा, मेहंदी, संगीत आणि हळद असे सर्व विधी पार पडले. त्यानंतर रविवारी अंकिता आणि कुणाल यांचा लग्नसोहळा कोकणात थाटामाटात पार पडला. या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.