अंटार्क्टिकातल्या प्राण्यांना होतोय सनबर्न

 अंटार्क्टिकातल्या प्राण्यांना होतोय सनबर्न

घातक अतिनील किरणांपासून – Ultraviolet Rays पासून संरक्षण करणाऱ्या वातावरणातल्या ओझोन गॅसच्या थराला छिद्र पडलंय आणि गेल्या वर्षभरापासून अधिक काळ हे छिद्र अंटार्क्टिका खंडाच्या वर आहे.

वातावरण बदलामुळे ऑस्ट्रेलियात पेटलेल्या भयानक वणव्यांतून बाहेर पडलेला प्रचंड धूर हे ओझोनच्या पातळीत घट होण्याचं मोठं कारण मानलं जातंय.

ओझोनला पडलेलं छिद्र

क्लायमेट चेंज बायोलॉजिस्ट प्रा. शॅरन रॉबिन्सन यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं, “मी लोकांना ओझोनच्या छिद्राबद्दल सांगते तेव्हा ते म्हणतात, ‘पण ते तर आता भरून येतंय ना?”

पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या सोलर रेडिएशनच्या प्रमाणावरून 1985 मध्ये अंटार्क्टिकामध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी ओझोनच्या थरातील छिद्राचा शोध लावला होता.

ओझोनवर परिणाम करून या वायूच्या पातळीत घट करणारी काही रसायनं – Chemicals हे छिद्र पडण्यासाठी कारणीभूत ठरतात.

ओझोनच्या थराला पडलेलं छिद्र पटकन भरून न येण्यामागे अनेक कारणं आहेत. यात वणवे, जगभरात जागृत झालेले ज्वालामुखी ही महत्त्वाची कारणं आहेत. कारण अशा घटनांमधून जे कण वातावरणात उत्सर्जित होतात ज्यामुळे ओझोनवर परिणाम करणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अधिक भडका उडतो.

वातावरणाचं तापमान कमी करण्यासाठी केले जाणारे काही प्रयोग – Geoengineering हे देखील घात ठरू शकत असल्याचं प्रा. रॉबिन्सन सांगतात. यामध्ये वातावरणाच्या वरच्या थरामध्ये कण सोडून ढग तयार करण्याची योजना आहे, पण यामुळेही ओझोन विरळ होणार असल्याने की कल्पना चांगली नसल्याचं त्या सांगतात.

प्रा. रॉबिन्सन म्हणतात, “अंटार्क्टिकाला मदत करण्यासाठी आपण करू शकतो अशी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हवामान बदल रोखण्यासाठी पावलं उचलणं. शक्य तितक्या लवकर कार्बन उत्सर्जन कमी करायला हवं, म्हणजे वणव्यांचं प्रमाण कमी हवोईल आणि ओझोनचा थर भरून येण्याची प्रक्रिया काहीशी सुकर होईल.”

ML/ML/PGB
13 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *