अनिल देशमुख यांची उद्या सुटका
मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने देशमुखांची बुधवारी ( २८ डिसेंबर ) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे. त्यामुळे १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
SW/KA/SL
27 Dec. 2022