लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत…

 लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत…

जालना दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रमाणे भत्ता मिळालेला नाहीये. यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून सरकारने तीन ते चार दिवसामध्ये प्रति अर्ज 50 रुपये प्रमाणे भत्ता अदा करावा नाहीतर आंदोलन करू असा इशारा जालन्यातील अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास 3 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले असून अंगणवाडी सेविकांनी तळमळीने काम करून लाडकी बहीण योजना राबविल्यामुळेच महायुतीला भरघोस यश मिळाल्याचे जालन्याच्या अंगणवाडी सेविकांनी म्हटलंय. राज्य सरकारने 3 ते 4 दिवसात अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेचे मानधन उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय.
ML/ML/SL
24 Dec. 2024

जालना दि २४:– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रमाणे भत्ता मिळालेला नाहीये. यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून सरकारने तीन ते चार दिवसामध्ये प्रति अर्ज 50 रुपये प्रमाणे भत्ता अदा करावा नाहीतर आंदोलन करू असा इशारा जालन्यातील अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *