महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे आझाद मैदानात आंदोलन

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई, दि १५
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात विविध मागण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यामध्ये प्रोत्साहन भत्ता रुपये २००० व १००० विना अट मानधनात वर्ग करावे. FRS मधील सर्व अडचणी सोडवा.तसेच त्याची सक्ती करु नका. FRS च्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नका. मातृवंदना आदी योजनाबाह्य कामांची सक्ती करु नका.पोषण अभियानासाठी स्वतंत्र निधी द्या. मासिक पेन्शन व ग्रॅच्युइटी लागू करण्याच्या आश्वासनाची ताबडतोब पूर्तता करा. ‘लाडकी बहीण’चे अर्ज भरण्याचा पूर्ण मोबदला द्या. मदतनिसांना देखील या कामाचा पूर्ण मोबदला द्या.
इत्यादी मागण्या शासनाने तात्काळ सोडविल्या नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे विधानभवनाबाहेर मुक्कामी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी दिली.
यावेळी शुभा शमीम, राजेश सिंग, भगवान देशमुख, सुवर्णा तळेकर, नितीन पवार, सुजाता रणनवरे, अरमाईटी इराणी,अर्चना अहिरकर यांनी मार्गदर्शन केले.
या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *