‘अंधार माया’ हॉरर वेबसिरिज लवकरच ZEE5 वर
मुंबई, दि. १९ : ZEE5 वर लवकरच ‘अंधार माया’ ही हॉरर ओरिजनल सीरीज रिलिज होणार आहे. या सीरिजचा हादरवून टाकणारा ट्रेलर रीलिज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने सीरिजची निर्मिती केली आहे.
‘अंधार माया’ची कथा आणि संवाद लोकप्रिय लेखक-अभिनेते प्रल्हाद कुडतरकरचे आहेत. कपिल भोपटकर यांची पटकथा असून दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेले जबरदस्त अभिनेते किशोर कदम गूढ भूमिकेत दिसतील. एका कुटुंबाच्या भूतकाळाने ग्रासलेल्या पूर्वजांच्या घरात घडणारी ‘अंधार माया’ची गोष्ट कोकणातील आहे. रहस्य, गूढ वातावरण आणि भावनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही सीरिज ZEE 5 वर 30 मे रोजी रीलिज होणार आहे.