अकोळनेर इथे सापडले दुर्मिळ जलचक्रव्युह शिल्प
अहमदनगर, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथे दुर्मिळ दगडी जलचक्रयूव्ह शिल्प शोधण्यात यश आले आहे, हे प्राचीन शिल्प साडेचार फूट व्यासाचे आणि अखंड पाषाणात कोरलेले आहे , महाराष्ट्रात प्रथमच असे दुर्मिळ शिल्प सापडले आहे. महाराष्ट्रातील गड, किल्ले संवर्धन आणि पुरातन वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची ही शोध मोहीम यशस्वी ठरली, चौकोनी आकाराच्या या दगडी शिल्पामध्ये समोरासमोर तोंड असणाऱ्या दोन नागांनी एकमेकांना गोलाकार सहा वेटोळे घातल्याचे दिसून येते.
ML/ ML/ SL
30 Sept 2024