पुरातन अंबरनाथ शिवमंदिर नगरपरिषदेच्या अतिक्रमणामुळे धोक्यात

 पुरातन अंबरनाथ शिवमंदिर नगरपरिषदेच्या अतिक्रमणामुळे धोक्यात

ेअंबरनाथ. दि. ३ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एक हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारं अंबरनाथचं शिवमंदिर परिरातील अनिर्बंध बांधकामांमुळे धोक्यात आले आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं हे हेमाडपंती मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, याच मंदिराच्या परिसरात स्थानिक नगरपरिषदेने केलेल्या बांधकामामुळे त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे RTI मध्ये उघड झाले आहे.

RTI मध्ये समोर आलेल्या माहिती यानुसार, अंबरनाथ नगरपरिषदेने (AMC) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून मिळालेल्या परवानगीचा गैरवापर केला आहे. एएसआयने केवळ जुन्या रस्त्याची दुरुस्ती आणि प्राचीन जलकुंडाच्या सुशोभिकरणासाठी परवानगी दिली होती. स्थानिक आणि पर्यावरणवाद्यांच्या मते, राज्य सरकारने यावर कठोर कारवाई न केल्यास, या प्राचीन वास्तूचे आणि तिच्या नैसर्गिक परिसराचे संरक्षण करणे कठीण होईल.

1958 च्या प्राचीन स्मारक कायद्यानुसार (AMASR Act) मंदिराच्या 100 मीटरच्या आत कोणतंही नवीन बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही, नगरपरिषदेने या संरक्षित क्षेत्रात 100 पेक्षा जास्त स्टॉल्स असलेला एक व्यावसायिक ‘प्लाझा’ बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मंदिराच्या संरचनेला धोका

हिराली फाऊंडेशनच्या खानचंदानी यांच्या तक्रारीनंतर, एएसआयने जानेवारी 2024 मध्ये मंदिराची पाहणी केली. त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतींना नैसर्गिक झीज झाल्याचे आढळून आले. तसेच, मूर्तींची धूप झाली असून, मंदिराच्या भिंतींना आणि दगडी तुळयांना तडे गेल्याचेही निदर्शनास आले.

याच कारणामुळे, मार्च 2024 मध्ये एएसआयने नगरपरिषदेला तात्काळ अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिले. या सर्व आरोपांवर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमाकांत गायकवाड यांनी मात्र कोणताही नियम मोडला नसल्याचा दावा केला आहे. सर्व आवश्यक परवानग्या घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *