अखेर आली लग्नघटिका! अनंत- राधिकाचा आज शाही विवाह सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही लग्नसोहळा हा जगभरात चर्चेचा विषय होता. दोन प्री वेडिंग सोहळे, पालघरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा आणि गेले आठवडाभर विविध कार्यक्रमांमुळे अंबानींचा ग्रॅंड लग्नसोहळा जगभरात लोकप्रिय होतो आहे. या इव्हेंटच्या अंबानी मुली, सुनांच्या दागिन्यांची, कपड्यांचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. अनंत अंबानीचे कपडे वनतारा थीमचे असल्यामुळे त्याचीही चर्चा आहे. सव्यसाची वगळून मनीष मल्होत्रा, अबू जानी-संदीप खोसला असे डिझायनर या कामी गुंतले आहेत. आज होणारा लग्नसोहळा तर विशेष आहे. बीकेसीतील जीओ सेंटरमध्ये हा लग्नसोहळा होणार आहे.
त्यासाठी बीकेसीतील ऑफिसेसना काही दिवसांसाठी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. तर ताज, ललित हॉटेलचे बुकींगही फूल्ल झाले आहे. लग्नासाठी आंतराराष्ट्रीय स्तरावरचे पाहुणे यायला सुरूवात झाली आहे. आज हा विवाहसोहळा संध्याकाळी होणार आहे. अवघं जग अनंत- राधिकाला नवरा बायको म्हणून पाहण्यासाठी उत्सुक आहे.