लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये १२ लाखांची वाढ

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत आता मोठी वाढ झाली आहे. २.४६ कोटी लाडक्या बहिणींना नुकताच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळाला आहे. या हत्याचे ३,६८९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये १२ लाखांची वाढ झाली.
आचारसंहिता लागल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले त्याची पडताळणी करता आली नव्हती. या अर्जांची डिसेंबरमध्ये पडताळणी करून पात्र महिलांना डिसेंबरमध्ये सहा महिन्यांचे मिळून ९,००० हप्ता देण्यात आला. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत २१,६०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहाव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले .
SL/ML/SL
31 Dec. 2024