राजर्षी छत्रपती शाहू जीवन कार्यावर आधारित प्रदर्शन

 राजर्षी छत्रपती शाहू जीवन कार्यावर आधारित प्रदर्शन

कोल्हापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक वारसा सप्ताहानिमित्त कोल्हापूर वस्तुसंग्रहालय (पुरातत्व विभाग) आणि पुरालेखागार (पुराभिलेखागार संचालनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्रे आणि दुर्मिळ कागदपत्रांचं प्रदर्शन कोल्हापुरात शाहू जन्मस्थळी आयोजित करण्यात आलं आहे. An exhibition based on the life work of Rajarshi Chhatrapati Shahu

कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या शाहू जन्मस्थळी लक्ष्मी विलास पॅलेस इथं आयोजित करण्यात आलेलं हे प्रदर्शन 25 नोव्हेंबर पर्यंत मोफत खुल़ं राहील.

या प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक विधानासंबंधीची कागदपत्रं, त्यांच्या राज्यारोहण समारंभाची कागदपत्रं, राजर्षी शाहू महाराजांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि पारित केलेले कायदे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणा, दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, कला, क्रीडा, कृषी, उद्योग क्षेत्रामधील शाहू महाराजांचं कार्य, दुष्काळ आणि प्लेग काळातील त्यांचं कार्य, या संदर्भातील अधिनियम, महत्वाचा पत्रव्यवहार अशी राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रं, छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

त्याचबरोबर शाहू कालीन शस्त्रास्त्रांचंही प्रदर्शन इथं भरविण्यात आलं आहे.या प्रदर्शनाचं उद्घाटन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट तर माहिती अधिकारी वृषाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या.

ML/KA/PGB
24 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *