पुण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

 पुण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहरातील गुन्हेगारी कृत्यांनी आता अक्षरशः कळस गाठला आहे. राजरोसपणे नियम मोडून आता गुन्हेगार पोलीसांवर हल्ले करू लागले आहेत. पुण्यात महिला पोलीस अधिकारी आणि तिच्या सहकाऱ्यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी गाडी चालवल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र चिडलेल्या कार चालकाने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय साळवे याला अटक केली आहे.. पुणे पोलीस आयुक्तांनी मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा चालकांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशाच एका कारवाई दरम्यान ही घटना घडली आहे.

विश्रामबाग पोलिसांनी वाहनांची तपासणी आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी चौकी उभारण्यात आली आहेत. दरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका मद्यधुंद वाहन चालकाला अडवले. यावेळी कार चालकांना पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांसोबत झालेल्या वादादरम्यान रागाच्या भरात चालकाने अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लायटर चुकीच्या पद्धतीने धरल्याने तो पेटला नाही. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी ताबडतोब चालकाला ताब्यात घेतले आहे.

ML/ML/SL

6 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *