देशात हिंसा आणि भीतीचे वातावरण
अकोला, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील आठ वर्षात भारत देशामध्ये हिंसा, भीती, द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे, आजचे भारतीय जनता पार्टीचे नेते शेतकऱ्यांशी युवकांशी बोलायला तयार नाहीत ते बोलले तर त्यांना कळेल की देशात किती मोठी बेरोजगारी पसरली आहे मात्र ते तसे करत नाहीत म्हणूनच आज देशामध्ये भारत जोडो यात्रेची गरज असून ही यात्रा लोकांच्या मनामध्ये असल्यामुळेच आज लाखो लोक घराबाहेर पडत आहेत असे प्रतिपादन भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यात दाखल झालेले राहुल गांधी यांनी वाडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.An atmosphere of violence and fear in the country
17 नोव्हेंबर 1933 रोजी महात्मा गांधी यांनी सुद्धा वाडेगाव येथे भेट देऊन सभा घेतली होती आज त्याच ठिकाणी 89 वर्षानंतर राहुल गांधी यांनी विदर्भातील बारडोली म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाडेगाव येथे भेट दिली हा योगायोग आहे.महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसेचा स्वच्छतेचा मार्ग दाखवला त्यांच्याशी माझी तुलना कधीही होऊ शकत नाही असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
भारतीय जनता पार्टीने आज प्रसार माध्यमांवर, न्याय मंडळावर दबाव टाकलेला आहे आपल्याला असा भारत हवा आहे की सर्वांना घेऊन चालणारा भारत, मात्र हे आता प्रत्येकाने ठरवणे गरजेचे आहे.
विनायक दामोदर सावरकर यांचे एक पत्र पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दाखवताना विनायक सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून क्रांतिकारकांना नेमका काय संदेश दिला.सावरकरांनी इंग्रजांना मी आपला नोकर राहू इच्छितो म्हणून पत्रावर केलेली स्वाक्षरी यावरून काय सिध्द होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू ,सरदार वल्लभभाई पटेल अनेक वर्ष तुरुंगात राहिले मात्र त्यांनी कधीही इंग्रजांना घाबरून असे केले नाही. राहुल गाँधी यांनी पत्रकार परिषदेत विनायक सावरकर यांचा माफीनामा दाखवला.
भारत जोडो यात्रा ही देशाला जोडण्याचे काम करीत आहे असे असताना जर केंद्र सरकार भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते केंद्र सरकारने करून पहावे असा इशाराही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भारत जोडो यात्रा ही शेतकऱ्यांचा सन्मान करणारी व प्रत्येकाला प्रेम देणारी आहे त्यामुळे या यात्रेत चालताना महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम रस्त्यांवर चालताना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नागरिकांमुळे मिळालेले विचार यामुळे महाराष्ट्राचे प्रेम कधीही विसरू शकत नाही खरी काँग्रेस ही महाराष्ट्रात आहे व महाराष्ट्राने नेहमीच काँग्रेसचा विचार जिवंत ठेवला आहे असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
ML/KA/PGB
17 Nov .2022