स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती भारतातून प्रथम…

अमरावती दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण भारतामध्ये NCAP (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम ) अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेचा देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने या संबंधीचे सर्वेक्षण देशातील विविध 94 शहरांमधे केले होते. यामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येचे शहर या वर्गवारीत अमरावती महानगरपालिकेने बाजी मारून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन 2023-24 मधे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शहरांचे विविध मानदंडात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवहन मंत्रालया मार्फत अमरावती महानगरपालिकेला देशात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भोपाळ येथे 7 सप्टेंबर 23 रोजी होणार आहे.
ML/KA/SL
5 Sept. 2023