अमरावती विमानतळाचे लोकार्पण १६ एप्रिलला …

अमरावती, दि. १२ (यशपाल वरठे) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवड्यातून सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे.
अलायन्स एअर लाईनच्या संकेत स्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे अशी माहिती आज महाराष्ट्र एअर डेवलपमेंट कंपनी च्या संचालिका स्वाती पांडे आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी विमानतळावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अमरावती विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार,पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम चेंजर ठरणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी udan योजनेंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवासासाठी सुवर्णद्वार ठरणार आहे असे जिल्हाधिकारी सौरभ यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ आहे.
ML/ML/SL
12 April 2025